Accident News : अपघातांचं सत्र सुरु असतानाच आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. (Mumbai Pune Express way) पुणे- मुंबई एक्स्प्रेस वेवर (Urse Toll) उर्से टोल नाका येथे नारायण राणे यांच्या कुटुंबियांच्या कारचा (Car Accident) अपघात झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अपघात किरकोळ स्वरुपाचा होता. त्यावेळी कारमध्ये राणेंचे सुपुत्र नितेश राणे यांची पत्नी, मुलं आणि नातेवाईक होते, अशी माहिती पिंपरी-चिंचवड पोलिसांनी दिली. (Big News Narayan rane Nitesh rane Family car Accident at Mumbai pune expressway)


सोमवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास उर्से टोल नाका येथे हा अपघात झाला. (Mumbai) मुंबईहून पुण्याच्या (Mumbai Pune) दिशेने येताना हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. उर्से टोल नाका येथे टोल भरण्यासाठी राणे कुटुंबीय प्रवास करत असलेली कार रांगेत थांबली होती. त्याचवेळी मागे टोल भरण्यासाठी थांबलेल्या ट्रकने राणे कुटुंबियांच्या मोटारीला किरकोळ धडक दिली. यात कारचं किरकोळ नुकसान झालं असलं तरीही सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालं नाही.