अनिरुद्ध दवाळे, झी 24 तास, अमरावती : अमरावतीमध्ये NIA आणि ATS चं पथक दाखल झालं आहे. अमरावतीतील झालेली औषधी व्यापाऱ्याची हत्या ही नुपूर शर्माचं समर्थन केल्यामुळे झाली, असा आरोप भाजपनं केला. त्यानंतर NIA आणि ATSचं पथक देखली अमरावतीत दाखल झालं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

औषध विक्रेता उमेश कोल्हे यांची 21 जून रोजी हत्या करण्यात आली. ते आपलं दुकान बंद करून आपला मुलगा आणि सूनेसोबत घरी जात होते. यावेळी तीन दुचाकीस्वारांनी कोल्हेंवर हल्ला करत त्यांची हत्या केली. 


कोल्हे यांनी नुपूर शर्माचं स्टेटस ठेवलं होतं, त्यामुळेच त्यांची हत्या केली, असा आरोप भाजपनं केला. त्यामुळे याबाबत केंद्रित तपास यंत्रणेकडून चौकशी ची मागणी चौकशी करण्यात यावी अशी मागणी भाजपने केली होती. 


या प्रकरणात 6 जणांना अटक करण्यात आली आहे. तर मुख्य आरोपी अद्याप फरार आहे. दरम्यान नुपूर शर्माचं समर्थन केल्यानं उदयपूरमध्ये कन्हैयालाल या व्यक्तीची करण्यात आली होती. . मात्र स्थानिक पोलिस याबाबत मौन बाळगून आहेत.