मुंबई : काबाडकष्ट करून तीन एक घर घेतले. एसआरएची योजना आली. पण त्यात फसवणूक झाली. पोलीस स्टेशन झालं, शासकीय कार्यालयाच्या अनेक फेऱ्या झाल्या. पण न्याय काही मिळाला नाही.. अखेर तिने मंत्रालय गाठलं... 
       
इकडे आझाद मैदानात सकल मराठा समाज आनंद साजरा करत होता. तर तिकडे मंत्रालयात ती महिला धीम्या गतीने मंत्रालयाचा एक एक मजला पार करत होती. तिने दुसरा मजला गाठला आणि आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.


पण, ती आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत असल्याची बाब मंत्रालयात काम करणाऱ्या काही महिलांच्या निदर्शनास आली. त्यांनी तिला अडवलं. तिची चौकशी केली. एसआरए घराची फसवणूक झाली म्हणून आत्महत्या करत असल्याचं कारण तिने सांगितले. ही महिला टिटवाळा येथे रहात असून रूप मोरे असं तिचं नाव आहे.