जावेद मुलाणी, झी 24 तास, इंदापूर : अचानक विमान कोसळून दुर्घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातकडबनवाडी इथे विमान कोसळून दुर्घटना घडली. या विमानाचे मन विचलित करणारे फोटो समोर आले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार हे विमान शिकावू होते. ट्रेनिंग दरम्यान विमानासोबत दुर्घटना घडली. यामागे नेमकं काय कारण आहे ते अद्याप समजू शकलं नाही. या दुर्घटनेत युवती जखमी झाली आहे. 




तांत्रिक बिघाडामुळे विमान कोसळल्याचा अंदाज आहे. या प्रकरणी आता पुढे चौकशी कधी होणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. सुदैवानं वैमानिक युवती बचावली. ती किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.