Ajit Pawar : अजित पवार तिसरी आघाडी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. वंचित, MIMसोबत विधानसभेत वेगळे आव्हान निर्माण करणार करण्याची तयारी आहे. अशातच आता या संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. अजित पवारांनी अमित शाहा यांची दिल्लीत भेट घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. महायुतीतील पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढली तर, काय परिस्थिती असेल यावर देखील चर्चा झाल्याचं सूत्रांकडून समजते. 


भेटीत नेमकी काय चर्चा झाली?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या भेटीत विधान परिषद निवडणुकीबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडे मतं कमी असताना देखील त्यांच्या दोन उमेदवारांचा विजय झाला.  याबाबत बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील मतदारांच्या बदललेल्या भूमिकेबद्दल बैठकीत चर्चा झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. 


उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. भेटीत विधानपरिषद निवडणुकीबाबत झाली चर्चा झाली.  विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे सर्वच्या सर्व 9 उमेदवारांचा विजय झाला होता.  राष्ट्रवादी (अजित पवार पक्ष) मत कमी असताना देखील त्यांच्या पक्षाच्या दोन्ही उमेदवारांचा विजय झाल्याने मिळालेल्या वाढीव मतांवर बैठकीत चर्चा झाली.  महायुतीतील दोन्ही पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढली तर काय परिस्थिती असेल यावर देखील झाली चर्चा.  जर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) स्वतंत्र निवडणूक लढवली तर राष्ट्रवादीला जास्त मत मिळू शकतील अस काही नेत्यांच म्हणण आहे.  प्रत्येक विधानसभा मतदार संघात अल्पसंख्यांकांची 10 ते 22 टक्के मत आहेत त्यातील जास्तीत जास्त मत राष्ट्रवादीला मिळू शकतात असा पक्षातील काही नेत्यांचा मतप्रवाह आहे.


अजित पवार तिसरी आघाडी करण्याच्या तयारीत 


अजित पवार तिसरी आघाडी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय...वंचित, MIMसोबत विधानसभेत वेगळे आव्हान निर्माण करणार करण्याची तयारी आहे. भाजपची ही नवीन खेळी असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे छगन भुजबळ असुरक्षित झाल्याची भावना असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. यासंदर्भात भुजबळांना विचारलं असता त्यांनी बोलणं टाळलं तर आम्हाला तिस-या आघाडीची गरज नसल्याचं धर्मरावबाबा अत्रामांनी म्हटलंय. तर तिस-या आघाडीबाबत अद्यापपर्यंत आम्हाला प्रस्ताव आलेला नाही. मात्र असा प्रस्ताव आल्यास आपण सकारात्मक आहोत असं एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी म्हटलंय.