Santosh Munde passed away : आपल्या अभिनयाने लाखो लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणणाऱ्या टिकटॉक स्टार संतोष मुंडेचं निधन झालं आहे. संतोष मुंडेसह त्याचा मित्र बाबुराव मुंडेचा शॉक लागून मृत्यू झाला आहे. बीडमधील धारूर तालुक्यातील भोगलवाडी येथे ही घटना घडली आहे. संतोष मुंडेच्या अपघाती निधनामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेमकं काय घडलं? 
संतोष आणि बाबुराव हे भोगलवाडे ते काळेचीवाडी या रस्त्यावर असणाऱ्या वीजेचा डिपीचा फ्युज टाकण्यासाठी गेले होते. मात्र तिथे शॉक लागून दोघांचा दुर्देवी मृत्यू झाला. संतोष मुंडे त्याच्या रील्समुळे महाराष्ट्रभर प्रसिद्ध झाला होता. संतोषच्या रील्स पाहिला की नकळत तुमच्या चेहऱ्यावर हसू आल्याशिवाय राहणार नाही. 


संतोषच्या हटके मराठवाड्याच्या ग्रामीण स्टाईलने रील्स बनवायचा. संतोषच्या अकाली निधनाची बातमी समजताच चाहत्यांनाही विश्वास बसत नाहीये. कारण कमी काळात संतोषने प्रसिद्धी मिळवली होती.