शिर्डी : नाताळच्या सुट्टीच्यानिमित्ताने शिर्डीत मोठ्या प्रमाणात भाविक दाखल झालेत. तीन दिवस जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे धार्मिक स्थळी मोठी गर्दी झालीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

साईबाबांच्या दर्शनाबरोबरीनेच शनी शिंगणापूर आणि औरंगाबाद येथे जाऊन पर्यटन आणि धार्मिक दर्शन करण्याकडे भाविकांचा कल आहे. भाविकांच्या गर्दीमुळे शिर्डी हाऊसफुल्ल झालीय. साईमंदिरात दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्यात. 


या गर्दीच्या काळात साईबाबा संस्थानने व्ही.आय.पीसाठी देण्यात येणारे पासेस बंद ठेवलेत. यावर्षी प्रथमच साईबाब संस्थानने आज रात्रभर मंदिर खुलं ठेवण्याचा निर्णय घेतलाय. साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या गर्दीमुळे शिर्डीत सर्व हॉटेल्स आणि रेस्टॉरंट हाऊसफुल्ल झालेत..