नागपूर मनपा साहित्य खरेदीत मोठा घोटाळा, धक्कादायक माहिती पुढे
Nagpur Municipal Corporation Scam : राज्याची उपराजधानीत मोठा घोटाळा पुढे आला आहे.
नागपूर : Nagpur Municipal Corporation Scam : राज्याची उपराजधानीत मोठा घोटाळा पुढे आला आहे. नागपूर मनपा साहित्य खरेदीत हा घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. या घोटाळ्यात धक्कादायक माहिती पुढे आली आहे. झेरॉक्स मशिनमधील ड्रम 20पट किंमतीना विकत घेतली गेली आहे. (Scam Purchase of materials in Nagpur Municipal Corporation)
नागपूर मनपात झालेल्या साहित्य खरेदी घोटाळ्यात धक्कादायक माहिती उघड झाली आहे. 1 हजार 999 रूपयांचा झेरॉक्स मशीनमधला ड्रम तब्बल 20 पट अधिक म्हणजे 24 हजार रूपयांना खरेदी झाला आहे. याआधी 8 हजारांचा कुलर 79 हजार रूपयांना घेतल्याचं उघड झाले होते.
त्यानंतर आता ही धक्कादायक बाब उघड झालीय. या संदर्बात काँग्रेस नगरसेवक संदीप सहारे यांनी मिळवलेल्या माहिती अधिकारात अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या आहेत.1999 रूपयांचा झेरॉक्स ड्रम 24 हजार रूपयांना खरेदी केला आहे. इतर साहित्य खरेदीही बाजारभावापेक्षा चढ्या दरात घेतले आहे.
ड्रम, टोनर व्यतिरिक्त फोन, इमर्जन्सी लँप या खरेदीत मोठी तफावत आढळली. बाजारभावापेक्षा कमालीच्या चढ्या दराने खरेदी झालीय. मनपाची आजची सर्वसाधारण सभा या स्टेशनरी घोटाळ्यावरून गाजण्याची चिन्हे आहेत.