Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या एका विधानासंदर्भात ही बातमी आहे. राज्यात राजकीय भूकंपाची शक्यता वर्तवली जात असतानाच मी पुन्हा येईन, असे फडणवीसांनी म्हटले आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. बेळगाव दौरा करुन कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडमध्ये पोहोचल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्याच्या सत्तासंघर्षाचा निकाल पुढील आठवड्यात?, राजकीय घडामोडींना वेग


सीमाभागात दौ-यावर असलेल्या फडणवीसांनी निट्टर गावातल्या नरसिंह मंदिराला अचानक भेट दिली. त्यावेळी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा राजकीय भूकंपाची शक्यता वर्तवली जात आहे. मी पुन्हा येईन असे फडणवीसांनी म्हटले आणि शिवसेनेत मोठी फुट पडून ते उपमुख्यमंत्री झालेत. त्यामुळे आता कोणता राजकीय भूकंप होणार, याची चर्चा सुरु झाली असून अनेकांच्या भुवया उंचावल्यायत. फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. 



राज्यात सत्ताबदलाची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तशी चर्चा आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही मोठा गट भाजपच्या उंबरठ्यापर्यंत आहे. तसा दावा भाजपच्या  नेत्यांनी केला आहे. तसेच ठाकरे गटाच्या एका आमदारांनी केला आहे. त्यामुळे राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच उपमुख्यमंत्री  फडणवीसांनी केलेल्या सूचक विधानामुळे नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.


दरम्यान, शरद पवार यांचे पुतणे आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार भाजपशी हातमिळवणी करण्याच्या विचारात असल्याची वृत्ते प्रसिद्ध झाल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले. अजित पवार सीमारेषेवर आणि पवारांपुढं रडणारे भाजप प्रवेशासाठी दरवाजात उभे होते, असा गौप्यस्फोट केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला होता. मात्र, राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी याचे खंडन केले आहे. असं काहीही होणार नाही, असे ते म्हणाले.  


कोल्हापूरच्या चंदगडमध्ये भगवान श्री नृसिंह मंदिरात देवेंद्र फडणवीसांनी दर्शन घेतले. यावेळी फडणवीस यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी हे विधान केले. पाटीलसाहेब, तुम्हाला एवढंच सांगतो की, इथे एकदा येऊन मन भरत नाही. त्यामुळे मी पुन्हा येणार आहे. तुम्हाला माहित आहे की जेव्हा मी सांगतो मी पुन्हा येईन, तेव्हा मी नक्की येतो. कसा येतो हेही तुम्हाला माहिती आहे. आपले कुलदैवतच नरसिंह आहे. आपण कुठूनही प्रगती करतो, असे यावेळी ते म्हणाले.