Ram Navami 2023 : शिर्डीच्या रामनवमी यात्रेतील दुर्घटनेबाबत मोठी अपडेट; पाळणा तुटून 4 जण झाले होते जखमी
Shirdi Ram Navami 2023 : पाळण्यांना शासकीय परवानगी नव्हती तरीही देखील हे पाळणे उभे राहिलेच कसे? असा महत्वाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. यामुळे शिर्डी नगरपालिका प्रशासन देखील संशयाच्या भोवऱ्यात आले आहे. अनधिकृत पाळणे उभे असताना नगरपालिकेची कारवाई का केली नाही असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे.
Shirdi Ram Navami 2023 : साईबाबांच्या शिर्डीत (Shirdi ) रामनवमी (Ram Navami ) उत्सवा दिवशी मोठी दुर्घटना घडली होती. रामनवमी उत्सवानिमित्ताने आयोजीत करणाऱ्यात आलेल्या यात्रेत अपघाताची घटना घडली होती. पाळणा निसटून चार जण जखमी झाले होते. शिर्डीमधील रामनवमी यात्रेतील दुर्घटनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांमी देखील गुन्हा दाखल केला आहे.
रामनवमी दिवशी नेमकं काय घडलं होत?
साईबाबांच्या शिर्डीत रामनवमी उत्सव मोठ्या जल्लोषात आणि भक्तीभावाने साजरा केला जातो. यंदा देखील हजारो भाविक रामनवमी उत्सवासाठी शिर्डीत दाखल झाले होते. शिर्डीत या रामनवमी यात्रेत पाळण्याचा अपघात झाला. यात्रेतील पाळणा निसटून चार जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर साईबाबा संस्थानच्या रूग्णालयात उपचार सुरु आहेत.एकाची प्रकृती चिंताजनक आहे.
पोलिसांची कारवाई
या दुर्घटनेनंतर पाळण्याच्या चालक मालकांवर शिर्डी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौकशी दरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे. शासनाकडून पाळणा चालवण्यासंदर्भात किंव्हा सुरक्षेसंदर्भात कुठलीही परवागणी घेण्यात आली नव्हती. या प्रकरणीच पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाळण्याचे मालक शिवाजी भोसले पाळण्याचे चालक हसन सय्यद आणि जागा मालक किशोर गोंदकर, रमेश गोंदकर, विजय गोंदकर आदी लोकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. भादंवी कायदा कलम 279 , 336 , 337 , 338 अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाळण्यांना शासकीय परवानगी नव्हती तरीही देखील हे पाळणे उभे राहिलेच कसे? असा महत्वाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. यामुळे शिर्डी नगरपालिका प्रशासन देखील संशयाच्या भोवऱ्यात आले आहे. अनधिकृत पाळणे उभे असताना नगरपालिकेची कारवाई का केली नाही असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे.
रामनवमी उत्सवात साईंच्या तिजोरीत कोट्यावधीचे दान
रामनवमी उत्सवात साईंच्या तिजोरीत कोट्यावधीचे दान पडले आहे. शिर्डीत रामनवमी निमित्ताने साईचरणी एक कोटीहून अधिक दान अर्पण करण्यात आले. तीन दिवसातच संस्थानाला एकूण 4 कोटी 9 लाख रुपयांचं दान प्राप्त झाले. आहे. यात दानपेटीत 1 कोटी 81 लाखांची रक्कम जमा झालीय. 171 ग्रॅम सोनं, 713 ग्राम चांदीही अर्पण करण्यात आली आहे. यासोबत 8 लाख 64 हजारांचे 171 ग्राम सोने तर 1 लाख 21 हजार 813 रुपये किमतीची 2 किलो 713 ग्राम चांदीही अर्पण करण्यात आली आहे.