अलिबाग : रायगड जिल्ह्यातील कारखाने ही जिल्ह्याची ऊर्जा असून ते कारखाने बंद पडत असल्यानं ते आपल्यासाठी सर्वात मोठं संकट आहे, असं शरद पवार यांनी म्हटलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या बंद पडलेल्या कारखान्यांमुळे शेकडो संसार उद्धवस्त होतायत. आमदार सुरेश लाड यांच्या नेतृत्वाखाली कामगारांच्या पाठीशी उभं राहायला आपण सदैव तयार आहोत असं स्पष्ट आश्वासन शरद पवार यांनी दिलं. 


कामगारांच्या प्रश्नावर सर्व पक्षांनी एकत्र येण्याचं आवाहनही पवारांनी यावेळी केलय. कर्जतचे राष्ट्रवादीचे आमदार सुरेश लाड यांच्या एकसष्टी निमित्त आयोजीत कार्यक्रमात ते बोलत होते. लाड यांच्या कामाचं कौतुक करताना आघाडी सरकारमध्ये त्यांना मंत्रिपद देऊ केलं होतं. मात्र त्यांनी ते नाकारलं असंही पवार यांनी भाषणात सांगितलं. 


या सोहळ्यात लाड यांच्या जीवनावरील 'कर्तृत्व'या गौरव ग्रंथाचं आणि 'नमस्कार मी सुरेश लाड बोलतोय' या पुस्तकाचं प्रकाशन झालं. एकसष्टी सोहळा गौरव समितीचे अध्यक्ष दत्तात्रय मसुरकर यांनी सर्वपक्षिय मान्यवरांचं स्वागत केलं.