CM Eknath Shinde And Sharad Pawar Meeting : महाराष्ट्राच्या राजकाराणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांची पुन्हा एकदा भेट झाली आहे. या भेटीमुळे राजकीय वरर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. या भेटीचा पूर्ण तपशील समोर आला नसला तरी आरक्षाच्या विषयाबाबत ही भेट असल्याचे समजते.  आज सकाळीच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली...त्यानंतर दुपारी शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांची भेट झाली.  दोन आठवड्यातील ही दुसरी भेट आहे. त्यामुळे राजकीय चर्चा रंगली आहे.  राज्यात सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणावरुन चांगलंच वातावरण तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर 22 जुलै रोजी शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती.  


या भेटीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्यामध्ये मराठा ओबीसी आरक्षणासंदर्भात चर्चा तर झालीच त्याचबरोबर दुधाच्या दरासंदर्भात देखील चर्चा झाल्याचं समोर आलं होतं. इतकंच नव्हे तर विरोधी पक्षातील सहकारी कारखान्यांना कर्ज पुरवठा होत नसल्याच्या मुद्द्या देखील शरद पवार यांनी उपस्थित केला होता. याच प्रश्नावर एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांना आश्वासन ही दिलं होतं की विरोधी पक्षातल्या नेत्यांच्या कारखान्यावर कोणताही अन्याय होणार नाही. 


दरम्यान,  आज झालेल्या भेटीत शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये मराठा आरक्षणासंदर्भात आगामी काळात काही पावलं उचलता येतील का यासंदर्भात देखील चर्चा झाल्याचं कळतंय. मात्र सलग दोन आठवड्यात दुसऱ्यांदा झालेल्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चांना उधाण आले.


शरद पवार यांच्या आधी राज ठाकरे यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट


शरद पवार यांच्या आधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या वर्षा निवासस्थानी भेट घेतली. यावेळी मुंबईतील बीडीडी चाळ पुनर्विकास, पोलीस वसाहतींचा पुनर्विकास, घरांची उपलब्धता विविध विषयांवर बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी राज्य प्रशासनातील वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.