नागपूर : नागपूर येथील मिहान येथे संरक्षण प्रकल्पाची कोनशिला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते बसविण्यात आली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फ्रांसच्या संरक्षण मंत्री फ्लोरेंस पार्ले यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. डिसॉल्ट एव्हिएशन यांच्या भागीदारीत धीरूभाई अंबानी एअरोस्पेस ही कंपनी ६५ हजार कोटी रुपयांचा प्रकल्प उभारणीसाठी गुंतवणुक करीत आहे. ही भारतातील संरक्षण क्षेत्रातील आतापर्यंतची सर्वात मोठी गुंतवणुक आहे. संरक्षण क्षेत्राकरता खासगी क्षेत्रातील हा मेक इन इंडिया अंतर्गत पहिला प्रकल्प आहे.


डीआरएल यांच्या मदतीने ५१-४९च्या प्रमाणातील भागिदारीने हा प्रकल्प उभारण्यात येत आहे. डीआरएल या कंपनीच्या प्रकल्पात राफेल लढाऊ विमानाच्या योजनेवर क्रियान्वयन येथे केले जाईल. या कंपन्यांची भागीदार केवळ तंत्रज्ञानाचे हस्तांरणच नाही तर घरगुती एअरोस्पेस क्षेत्रात पर्यावरण आणि जागतिक सप्लाई चेन जोपासण्याचं कार्य करेल.