पंचवटी एक्स्प्रेसमध्ये आनंदाच्या भरात बिपीन गांधी यांचा मृत्यू
आयुष्यभर पंचवटी एक्सप्रेससाठी खस्ता खाणाऱ्या बिपीन गांधी यांना आज नवीन पंचवटी एकप्रेसच्या येण्याच्या आनंदानं नाशोकच्या प्लटफॉर्मवर हृदयविकाराचा झटका आला.
नाशिक : नाशिक-मुंबई प्रवास करणाऱ्यांसाठी अख्खं आयुष्य खर्ची घालणाऱ्या आयुष्यभर पंचवटी एक्स्प्रेसाठी खस्ता खाणाऱ्या बिपीन गांधी यांना आज नवीन पंचवटी एक्स्प्रेच्या येण्याच्या आनंदानं नाशिकच्या प्लटफॉर्मवर हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच ययांचा मृत्यू झाला. रेल प्रवासी संघटनेचा आजचा आनंद दिवस होता. मात्र, गांधी यांच्या मृत्यूने आनंदी वातावरण गंभीर झालं. ज्यांनी आयुष्यभर या गाडीसाठी प्रयत्न केले आणि त्याच गाडीत त्यांचे प्राण गेल्याने अनेकांना चुटपूट लागली. तशी प्रतिक्रिया यावेळी व्यक्त होताना दिसत होती. त्यांच्या मृत्यूने गाडीत सुन्न वातावरण दिसून आले.
नाशिक जिल्ह्याची जीवनवाहीनी समजल्या जाणाऱ्या मनमाड -छत्रपती शिवाजी टर्मिनस पंचवटी एक्सप्रेस आजपासून अत्याधुनिक रुपात प्रवाशी चाकरमान्यांच्या सेवेत रुजू झाली आहे. एअर टँक, एअर डिस्क ब्रेक तंत्रज्ञान वापरून या पंचवटीचे नवीन कोच डिजाईन आले आहे. आजपासून नाशिक मनमाड नवीन एक्स्प्रेचा आनंद मिळणार आहे.
मात्र बिपीन गांधी यांच्या अचानक जाण्याने रेल्वेतील आनंदी वातावरण दु:खात झाले. या गाडीसाठी अपार मेहनत घेणाऱ्या बिपीन गांधी यांनी रेल्वे मंत्रालयाला भंडावून सोडणाऱ्याआणि शेकडो पत्र पाठविणाऱ्यया रेल परिषदेच्या संस्थापकाने पंचवटी एक्स्प्रेसची बोगी आपल्या कामाने विमानाप्रमाणे असावी, अशी बनविली होती. बोगीत मेडिटेशन, रेल्वे होस्टेस ,बाहेरील खाद्य पदार्थाना बंदी ,कचरामुक्त डबा असे अनेक विविध उपक्रम ते राबवित असत इतकेच नाही तर या बोगीचा वाढदिवस दरवर्षी ते साजरा करत असत. आपल्या आणि नाशिककरांच्या जीवनात आनंद आणणाऱ्या या कार्यकर्त्याला सलाम आणि श्रद्धांजली.