नाशिक : महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निफाड तालुक्यातील नांदुरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात पहिल्या पक्षी संमेलनाचे आयोजन करण्यात आलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पक्षाच्या आवडत्या स्थळी सीसीटीव्ही लावण्यात येणार असून शाळांतील मुलांना पक्षाविषयी जागरुकता वाढविण्यासाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. 


नांदुरमध्यमेश्वर अभयारण्य हे पक्षीमित्रांसाठी पक्षीतीर्थ बनलेय. दरवर्षी हिवाळ्यात अभयारण्यात येणाऱ्या परदेशी पक्ष्यांच्या संख्येत वाढ होत आहे. पक्षी बघण्यासाठी येणाऱ्यांची गर्दीदेखील वाढत आहे.


वनविभागाने याची लोकप्रियता बघून प्रथम होणाऱ्या संमेलनात पक्ष्यांवर आधारित विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. त्यामध्ये पक्षी निरीक्षणासाठी सकाळ आणि सायंकाळी खास भ्रमंती, पक्षी आणि नांदुरमध्यमेश्वर अभयारण्य तसेच पक्षी निरीक्षण, छायाचित्रण या विषयावर मार्गदर्शन, मुलांसाठी मनोरंजनाचे कार्यक्रम, नांदुरमध्यमेश्वर बर्ड रेस, अभयारण्यावरील छायाचित्रांचे प्रदर्शन, हेरिटेज वॉकसह अभयारण्याविषयी तज्ज्ञांचे मार्गदर्शन करण्यात येतंय.