बिटकॉईन फसवणूक, मुख्य आरोपी नांदेड पोलिसांच्या ताब्यात
आभासी चलनाच्या मायाजालाचे आमिष दाखवून हजारो गुंतवणुकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणारा पोलिसांच्या ताब्यात.
नांदेड : आभासी चलनाच्या मायाजालाचे आमिष दाखवून हजारो गुंतवणुकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणारा गेनबिटकॉईनचा निर्माता अमित भारद्वाजला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. अमित भारद्वाज विरूद्ध पुणे आणि नांदेड पोलिसांत गुन्हे दाखल झाले होते. कोट्यवधी रुपयांची फसवणूक करुन अमित भरद्वाज दुबईमध्ये आलिशान लाईफ जगत होता.
महाराष्ट्रात सुमारे दोन हजार कोटी रुपयांचा हा गैरव्यवहार असुन त्याची चौकशी गृहखात्याने ईडीकडे दिली आहे. अमित भारद्वाजच्या नावाने लूक आऊट नोटीस जारी करण्यात आली होती. दिल्ली विमानतळावर पोलिसांनी अमित भारद्वाजला अटक केली.
नांदेडमध्ये भारद्वाजवर गुन्हा दाखल असल्याने त्याला नांदेड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. अमित भारद्वाजला नांदेड न्यायालयाने १८ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.