जळगाव : जामनेर भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीत अलिकडेच दाखल झालेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी  सुरुंग लावला आहे. जामनेर विधानसभा मतदारसंघातील १७५ भाजपमधील कार्यकर्त्यांचा खडसे यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीत प्रवेश झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जामनेर विधानसभा क्षेत्रातील देवपिंप्री आणि नेरी येथील १७५ भाजप कार्यकर्त्यांनी माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे यांच्या उपस्थिती आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. प्रवेश करणाऱ्यामध्ये सर्व कार्यकर्ते हे भाजपमध्ये काम करत होते. त्यातले काही पदाधिकारी आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दिली.


जामनेर हा माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या बालेकिल्ला आहे. कालच माध्यमांशी बोलताना कुणीच भाजप सोडून गेले नसल्याचे वक्तव्य  महाजन यांनी केले होते. मात्र आज त्यांच्या मतदारसंघातील एकूण १७५ कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.



जामनेर विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. हे कार्यकर्ते आधी भाजपमध्ये काम करत होते. काही पदाधिकारी आहेत तर काही पदाधिकारी होते. आता या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्याने राष्ट्रवादी पक्षाला अधिक बळकटी या मतदारसंघात आलेली आहे, अशी माहिती एकनाथ खडसे यांनी दिली.