मुंबई रेसकोर्सचे मालक कोण? आज 1 BHK ही येणार नाही इतक्या किंमतीत झालेला 225 एकरांचा सौदा
Mumbai Mahalaxmi Racecourse : महालक्ष्मी रेसकोर्सवर थीम पार्क उभारलं जाण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. कारण, महालक्ष्मी रेस कोर्सची तब्बल 120 एकर जागा अखेर बीएमसीला देण्यास मंजुरी मिळाली आहे. मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी ही माहिती दिली. रेसकोर्सच्या या जागेवर शहरात येत्या काळात सेंट्रल पार्क, ओपन स्पेस गार्डन आणि गार्डन तयार होणार आहे.
Mumbai Mahalaxmi Racecourse : मुंबईच्या सौंदर्यामध्ये भर टाकणाऱ्या आणि शहरातील महत्त्वाच्या ठिकाणांपैकी एक असणाऱ्या महालक्ष्मी रेसकोर्सचा चेहरामोहरा येत्या काळात बदलणार आहे. यामागचं कारण असेल ते म्हणजे शहराच्या मोक्याच्या ठिकाणी तयार होणारं थीम पार्क.