राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये मात्र वेगळे चित्र पाहायला मिळतेय.  राष्ट्रवादी, शिवसेना,आणि काँग्रेस या तीन पक्षांनी मिळून राज्यात सरकार स्थापन केले. पण आता या तीन मित्रपक्षांमध्येच सत्तेवरुन फूट पडताना दिसत आहे. भंडाऱ्यातील जिल्हा परिषदेत याचा ट्रेलर पाहायला मिळाला. देशात आणि राज्यात भाजपचा काँग्रेस हा सर्वात मोठा विरोधी पक्ष आहे. भडाऱ्यांत मात्र या दोन मोठ्या पक्षांनी हातमिळवणी करत राष्ट्रवादीला धक्का दिलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पक्षनिहाय निवडून आलेले सदस्य 


भंडाऱ्यात भाजपचे 12 सदस्य, काँग्रेसचे 21 सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेस 13 सदस्य, बसपाचा 1 सदस्य, शिवसेनेचा 1 सदस्य, वंचितचा 1 सदस्य आणि अपक्ष 3 सदस्य निवडून आले आहेत. जिल्हा परिषदेवर बहुमत मिळवण्यासाठी एकमत मात्र होत नव्हते. एकूण 52 सदस्य असलेल्या जिल्हा परिषदेवर सर्वाधिक सदस्य असलेला काँग्रेस हा मोठा पक्ष ठरला आहे. त्यामागोमाग राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचा नंबर लागतो. एकहाती सत्ता मिळवण्यासाठी संख्याचे समीकरण जुळत नसल्याने राष्ट्रवादी आणि काँग्रेस दोन्ही पक्ष भाजप सोबत जायला तयार होते. 


भाजप-काँग्रेसकडून नामांकन दाखल


भाजपच्या एका गटासोबत काँग्रेसने हातमिळवणी केली आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी काँग्रेसचे गंगाधर जिभकाटे तर उपाध्यक्ष पदासाठी भाजपचे संदीप ताले यानी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. काँग्रेसने बाजी मारत सत्ता काबीज करण्यात यश मिळवले. भाजप आणि काँग्रेसच्या या युतीमुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली झाले. या निवडणुकीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि भाजप नेते परिणय फुके आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. राष्ट्रवादीला दूर ठेवण्यासाठी काँग्रेसने खेळी खेळत शत्रूपक्षाला मित्रपक्ष बनवत नवी युती स्थापन केली.