भाजप - राष्ट्रवादीचे कार्यकर्ते गणेश मिरवणुकीमध्ये एकमेकांना भिडलेत
मिरज शहरात दगड, लाठ्या-काठ्या घेऊन हे दोन्ही गट एकमेकांशी भिडले. किरकोळ वादातून दोन गटांमध्ये हाणामारी झाली.
सांगली : मिरज शहरात दगड, लाठ्या-काठ्या घेऊन हे दोन्ही गट एकमेकांशी भिडले. किरकोळ वादातून दोन गटांमध्ये हाणामारी झाली. भाजपचे महादेव कुरणे आणि राष्ट्रवादीचे अभिजित हारगे गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या हाणामारीत कुरणे गटाचे 4 जण तर हारगे गटाचे दोन जण गंभीर जखमी झाले. दरम्यान, महापालिका निवडणुकीचा वाद गणेश मिरवणुकीमध्ये उफाळून आल्याचे दिसून आले.
गणपतीची मिरवणूक सुरू असताना कुरणे गटाचे लोक गणपती घेऊन येत होते. यावेळी रागाने का बघितला या कारणावरून कुरणे आणि हारगे गट एकमेकांना भिडले. यावेळी हाणामारीत काट्यांचा वापर करण्यात आला. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय.
सध्या परिसरामध्ये तणावाचं वातावरण आहे. या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. मुळात या दोन्ही गटांमध्ये निवडणुकीचा वाद आहे, वारंवार या दोन गटांमध्ये कुरबुरी आणि हाणामारीचे प्रकार होत असतात. दरम्यान, सांगली महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीच्या संगिता हारगे आणि भाजपचे शुभांगी कुरणे यांच्यात लढत झाली होती. यात राष्ट्रवादीच्या संगिता हारगे यांनी विजय मिळवला. याच रागातून हा राडा झाल्याचे सांगण्यात येत आहे.