`सुपाऱ्या घेऊन आम्हाला...`; संजय राठोडांसदर्भात प्रश्न विचारताच भडकल्या चित्रा वाघ
तुम्ही मला शिकवू नका निघा असेही चित्रा वाघ म्हणाल्या
Chitra Wagh Angry : पूजा चव्हाण प्रकरणावरुन (Pooja Chavan case) आक्रमक असणाऱ्या भाजप (bjp) महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) यांना शिंदे गटातील मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्याबाबत प्रश्न विचारताच चांगल्या आक्रमक झाल्याच्या पाहायला मिळाल्या. यवतमाळ (yavatmal) येथे पत्रकार परिषदेत चित्रा वाघ यांना संजय राठोड यांच्यासंदर्भात प्रश्न विचारला होता. त्यावेळी चित्रा वाघ पत्रकारांवर भडकल्या (Chitra Wagh angry on journalist).
संजय राठोड यांच्यावर पूजा चव्हाण प्रकरणात आरोप करून आपण त्यांचे राजकीय जीवन उध्वस्त केले नाही का, चित्रा वाघ भडकल्या. प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारास का बोलावले?, यापुढे अशा पत्रकारांना आपल्या पत्रकार परिषदेत आमंत्रित करायचे नाही, असा इशारा चित्रा वाघ यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना दिल्या. (bjp Chitra Vagh got angry when he asked a question about Sanjay Rathod)
यानंतर पत्रकारांनी चित्रा वाघ यांच्या पत्रकार परिषदेवर बहिष्कार टाकून निषेध नोंदवला. प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर चित्रा वाघ यवतमाळ येथे आल्या होत्या. राज्य सरकारने 100 दिवसांत महिलांच्या सन्मानसाठी राबविलेल्या उपाययोजनांची माहिती देण्यासाठी चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी वाघ यांना संजय राठोड यांच्यासंदर्भातील प्रश्न विचारला होता.
"मी याप्रकरणी न्यायालयात गेली आहे. तुम्ही मला शिकवू नका निघा. असल्या पत्रकारांना बोलवू नका सुपाऱ्या घेऊन आम्हाला प्रश्न विचारण्यासाठी येतात," असे म्हणत चित्रा वाघ पत्रकारांवर भडकल्या.
दरम्यान, संजय राठोड यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आल्याने चित्रा वाघ यांनी जाहीरपणे विरोध केला होता. पूजा चव्हाणच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या संजय राठोड यांना पुन्हा मंत्रीपद दिलं जाणं हे अत्यंत दुदैवी असल्याचं चित्रा वाघ यांनी म्हटलं होतं. तसेच आपला लढा सुरु राहणार असल्याचंही चित्रा वाघ म्हणाल्या होत्या.