अजित पवार गटाच्या मतदारसंघावर भाजपनं दावा ठोकला; महायुतीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर
Maharashtra politics : लातूर जिल्ह्यातील उदगीर मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा थेट सामना होईल असं वाटत असतानाच आता भाजपकडून उदगीरच्या जागेवर दावा करण्यात येतोय. त्यामुळे अजितदादांचे भिडू असलेले मंत्री संजय बनसोडे यांची कोंडी होण्याची शक्यता आहे.
Vidhansabha Election 2024 : लातूर जिल्ह्यात भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादीमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचं चित्र आहे. विधानसभा निवडणुका तोंडावर आली असतानाच महायुतीमधील अंतर्गत वाद आणि कलह आता चव्हाट्यावर येऊ लागलेत. क्रीडामंत्री संजय बनसोडेंच्या उदगीर मतदारसंघावर भाजपनं दावा ठोकलाय.
भाजपच्या विश्वजित गायकवाडांच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. उदगीर हा भाजपचा पारंपारिक मतदारसंघ असल्यानं भाजपकडेच राहिला पाहिजे,अशी मागणी विश्चजित गायकवाडांनी बावनकुळे यांच्याकडे केलीय.
विश्वजित गायकवाड यांच्याप्रमाणेच भाजपचे अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष दिलीपकुमार गायकवाडही उदगीरमधून लढण्यास इच्छुक आहे. तसेच लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले माजी खासदार सुधाकर शृंगारे यांनी सुद्धा उदगीरमधून लढण्यासाठी चाचपणी करत आहेत. भाजपनं महायुतीचा धर्म पाळावा,अन्यथा आम्ही सुद्धा लातूरच्या इतर जागेवर मागणी करू,असा इशारा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिलाय.
विश्वजित गायकवाड यांच्याप्रमाणेच भाजपचे अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष दिलीपकुमार गायकवाडही उदगीरमधून लढण्यास इच्छुक आहे. तसेच लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले माजी खासदार सुधाकर शृंगारे यांनी सुद्धा उदगीरमधून लढण्यासाठी चाचपणी करत आहेत.
एकच वादा अजित दादा...
एकच वादा अजित दादा अशा घोषणा देत अजित पवार समर्थकांनी त्यांचा ताफा अडवला...विधानसभेला निवडणूक लढवणार असल्याची घोषणा अजितदादांनी करावी अशी मागणी अजित पवार समर्थकांनी यावेळी केला...बारामतीच्या सातव चौकात अजित पवार समर्थकांनी त्यांचा ताफा अडवला...आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच ठिय्या मांडला...गेल्या काही दिवसांपासून बारामतीतून निवडणूक लढवणार नसल्याचे संकेत अजित पवार देत असल्याने त्यांचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पहायला मिळताय...