पिंपरी-चिंचवड : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आजी-माजी आणि भावी सहकाऱ्यांबद्दल केलेल्या विधानाने राज्याच्या राजकारणात नवी चर्चा सुरु झाली असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या एका विधानाने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या (Pimpri-Chinchwad Municipal Corporation Election) तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मोठं विधान केलं आहे. पिंपरी चिंचवडच्या आकुर्डीमध्ये डॉक्टर डी वाय पाटील ज्ञानशांती शाळेचं उदघाटन पवार यांच्या हस्ते झालं. यावेळी भाषण करताना अजित पवार यांनी खळबळजनक दावा केला.


पिंपरी चिंचवडमध्ये अनेक नगरसेवक राष्ट्रवादीत (NCP) येण्यास इच्छूक असल्याचं स्पष्ट अजित पवार यांनी म्हटलं आहे. मात्र इलेक्टिव्ह मेरिटवर प्रवेश दिला जाईल असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे महापालिका निवडणुकीआधी भाजपला धक्का बसणार का याची चर्चा पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात सुरु झाली आहे.


राष्ट्रवादी काँग्रेसने पिंपरी-चिंचवड्याच्या विकासासाठी अनेक वर्ष काम केलं. पण 2013-14 मध्ये देशात नरेंद्र मोदींची हवा होती, त्यामुळे चांगलं काम करुनही राष्ट्रवादी काँग्रेसला विरोधात बसावं लागलं. पण आता भाजपचे अनेक नगरसेवक आपल्या संपर्कात असल्याचा दावा अजित पवार यांनी केला आहे.


मुख्यमंत्र्यांच्या विधानावर प्रतिक्रिया


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आजी-माजी आणि भावी सहकाऱ्यांबद्दल केललं एक विधान आज राजकीय वर्तुळात चांगलंच चर्चेत आलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या त्या विधानावरही उपमुख्यमंत्री अजित पवार प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या मानत काय चाललंय हे कळत नाही, पण सध्या आमचे सरकार व्यवस्थित चालू आहे. त्यामुळे मी त्या विधानाला विशेष महत्व देत नसल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख आहेत, त्यांनी काय बोलव, काय बोलू नये हा त्यांचा प्रश्न आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.