पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील भाजप नगरसेविकेच्या मुलाने स्वतःवर गोळी झा़डून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रसन्न शेखर चिंचव़डे असे आत्महत्या केलेल्या 21 वर्षीय तरुणाचे नाव आहे.
 
 रविवारी रात्री प्रसन्नाने नेहमीप्रमाणे कुटूंबासोबत जेवण केले. त्यानंतर त्याने स्वतःच्या खोलीत जाऊन स्वतःवर गोळी झाडून घेतली.
 
 गंभीर जखमी झालेल्या प्रसन्नाला एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. 
 
 प्रसन्नाचे वडील शेखर चिंचवडे यांच्याकडे परवानाधारक पिस्तुल आहे. त्याच पिस्तुलीने प्रसन्नाने स्वतःवरच गोळी झा़डून घेतली. 
 
 प्रसन्नाच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस याप्रकरणाचा पुढील तपास आहे.