COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धुळे : धुळ्यात भाजप नेते एकनाथ खडसे यांनी रिक्षात सफर केली. अन्यायाविरोधातल्या आक्रोशाबाबत ही सफर होती. खान्देशात एकनाथ खडसेना मंत्रिमंडळात घेतलं जात नाही म्हणून आक्रोश वाढत चाललाय. त्याचाच प्रत्यय धुळ्यात पाहायला मिळाला. 


अन्यायाविरोधातील आक्रोशाला मूक संमती


अमळनेरच्या कैलास चौधरी या भाजप कार्यकर्त्याने आपल्या रिक्षावर एकनाथ खडसे यांचा फोटो लावून अन्याय हा शब्द लिहिलाय. या रिक्षात बसून खडसे यांनी अन्यायाविरोधातील आक्रोशाला मूक संमती दिल्याने चांगलीच राजकीय चर्चा रंगलीय.