बारामती, पुणे : पुण्यश्र्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं जलसंधारणमंत्री राम शिंदे यांनी सरकारला घरचा आहेर दिला. धनगर आरक्षणावरुन त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याच व्यासपीठावरून धनगर आरक्षणाचं आश्वासन दिलं होतं. पण तीन वर्ष होत आली,तरी त्याचं पालन झालेलं नाही अशी खंत यावेळी शिंदेंनी व्यक्त केली. शिंदे काल बारमतीमध्ये बोलत होते. 


पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, खासदार सुप्रिया सुळे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आमदार दत्तत्रय भरणे उपस्थित होते.  मुख्यमंत्री ज विरोधीपक्षात असताना सत्ता आल्यावर पहिल्याच कॅबिनेटमध्ये धनगर आरक्षणाचा निर्णय घेऊ असं सांगितलं.