भाजप हा आता एक नंबरचा शत्रू - शिवसेना
भाजप हा आता एक नंबरचा शत्रू आहे,आणि या भाजपला हद्दपार करण्यासाठी कोकणातील आम्ही सर्व नेते एकत्र आलो आहोत, असं म्हणत शिवसेनेनं कोकणात आज निर्धार मेळावा केला.
रत्नागिरी : भाजप हा आता एक नंबरचा शत्रू आहे,आणि या भाजपला हद्दपार करण्यासाठी कोकणातील आम्ही सर्व नेते एकत्र आलो आहोत, असं म्हणत शिवसेनेनं कोकणात आज निर्धार मेळावा केला.
गेल्या अनेक वर्षात एकाच व्यसपीठावर न दिसलेले शिवसेनेचे कोकणातील नेते निर्धार मेळाव्यात एकत्र पाहायला मिळाले. आजच्या निर्धार मेळाव्यात शिसेनेने भाजप आणि नारायण राणे यांना लक्ष करताना नाणार प्रकल्पाच्या विरोधात शिवसेना अखेरपर्यंत कोकण वासीयांसोबत राहील अशी घोषणा केली.
दरम्यान, भाजपनेही शिवसेनेला सोबत न घेता स्वबळाचा नारा दिलाय. त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजप विरुद्ध शिवसेना असा सामना रंगणार असल्याचे दिसून येत आहे.
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनं आता शिवसेनेची मदत न घेता स्वबळाचा नारा देत जिल्ह्याजिल्ह्यात मेळाव्यांचं आयोजन सुरु केलंय. जळगावात आज जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत जळगावसह धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा विभागीय मेळावा आयोजित करण्यात आला होता.