रयत क्रांती ही संघटना, आमचा पक्ष भाजपा - सदाभाऊ खोत
कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी अखेर आपला पक्ष भाजप असल्याचे जाहीर केलंय.
मुंबई : कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी अखेर आपला पक्ष भाजप असल्याचे जाहीर केलंय. रयत क्रांती संघटना हा पक्ष नव्हे, तर ही सामान्य माणसांचा आवाज उठवणारी संघटना आहे. त्यामुळे आमचा पक्ष हा भाजपा असल्याची भूमिका कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी स्पष्ट केलीये.