Uddhav Thackeray | “सर्वात निष्क्रिय मुख्यमंत्री म्हणून इतिहासात उद्धव ठाकरे यांची नोंद होईल”
`मुख्यमंत्री (Chief Minister Uddhav Thackeray) निष्क्रिय असल्यामुळे राज्याची ही अवस्था झाली आहे`.
सिंधुदुर्ग : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सराकारी नोकरभरतीचे (Governemt Exam Paper Leak) विविध विभागाचे पेपर फुटले. यामध्ये आरोग्य विभाग (Health Department) , म्हाडा (Mhada) आणि टीईटी (TET) सारख्या परीक्षांचा समावेश आहे. तसेच पोलीस भरतीतही गैरव्यवबहार झाल्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. राज्यात सुरु असलेल्या या सर्व मुद्द्यांवरुन भाजपचे नेते आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर (Cm Uddhav Thackeray) जोरदार टीका केली आहे.
मुख्यमंत्री निष्क्रिय असल्यामुळे राज्याची ही अवस्था झाली आहे, अशा शब्दात निलेश राणे यांनी हल्ला चढवला आहे. ते कुडाळमध्ये (Kudal) पत्रकारांशी बोलत होते. यावेळेस त्यांनी हे विधान केलं. (bjp leader and ratnagiri sindhudurg loksabha constituency former mp nilesh narayan rane slams to chief minister uddhav thackeray over to government exam paper leak at kudal)
निलेश राणे काय म्हणाले?
"निष्क्रिय मुख्यमंत्री असल्यामुळे महाराष्ट्राची ही अवस्था झाली आहे, शिक्षणापासून ते लहान मुलांच्या आहारा पर्यंत आणि पोलिस खात्यापासून ते महिला अत्याचाराचे विषय रोज बाहेर येत आहेत. महाराष्ट्राची इतकी वाईट अवस्था कधीच झाली नव्हती MVA सरकारचा सर्वनाश झाल्या शिवाय आता पर्याय नाही", अशा शब्दात निलेश राणे यांनी जोरदार 'प्रहार' केला.