नागपूर : Chandrakant Bankule on Nana Patole : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे खोटे बोलण्याचा काम करत आहेत. नाना पटोले हे 'मिस्टर नटवरलाल' भूमिकेत आहेत. देशाचे पंतप्रधान मोदी यांच्या बद्दल बोलून गावातील गावगुंडाबद्दल बोलल्याचं सांगत ते खोटं बोलत आहे. एवढेच नाही तर ते काँग्रेसची प्रतिमा घालवण्याचा काम करत आहेत, अशी टीका भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. (BJP leader Chandrakant Bankule criticized Congress state president Nana Patole)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाना पटोले हे खोटे बोलत आहेत. त्यांच्यामुळे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची प्रतिमा जाण्याची वेळ आली आहे. मी त्यांच्या विरोधात आंदोलन केले तिथे माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पण ज्या ठिकाणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हे वक्तव्य केले. तिथे चारशे लोकांची गरज होती का? आता त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही, मी याविरोधात न्यायालयात जाणार आहे, अशी माहिती बावनकुळे यांनी दिली. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याशिवाय स्वस्थबसणार नाही, असे  ते म्हणालेत.


काँग्रेसचे खासदार कोल्हे यांच्या भूमिकेवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले ते कलाकार म्हणून काम करत आहेत. दुसरीकडं नाना पटोले म्हणतात आम्ही सिनेमा चालू देणार नाही. त्यामुळे हा राजकीय सिनेमा बंद करा, पटोले यांना महात्मा गांधी यांच्यावर प्रेम असेल तर  तर सत्तेतून बाहेर पडा, असे आव्हान बावनकुळे यांनी दिले. 
 
दरम्यान, नागपूर जिल्ह्यात ग्रामीण भागात अश्लिल नृत्याचे प्रकार उघडकीस हेत आहे. या अवैध धंद्यांना ऊत आला आहे, बेकायदेशीररित्या सुरु असलेले  धंदे सट्टापट्टी पालकमंत्र्यांचा याकडे लक्ष नाही.  पोलिसांनाही सगळ्या धंद्याची माहिती पोलिसांना असून हफ्ते वसुली सुरु आहे, असा आरोप त्यांनी केला. तसेच शहराबाहेर फार्म हाऊसवर असे धंदे सुरु असल्याचेही ते म्हणालेत.