जळगाव : पक्षांतराबाबत आपण नितीन गडकरींच्या भूमिकेशी सहमत असल्याचं भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी म्हटलंय. आगामी निवडणुकीत भाजप स्वतंत्र लढली तरीही १६० पेक्षा जास्त जागा जिंकेल, असं भाकितही त्यांनी केलं आहे. एकनाथ खडसे यांनी युती होईल असं देखील म्हटलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'२५ वर्षानंतर युती तोडण्यांमध्य़े मतमतांतर होतं. काही क्षेत्रामंध्ये शिवसेना वर राहिल की नाही, आपल्याला यश मिळणार की याबाबत मतमतांतर होतं. युती तोडण्याचा निर्णय हा सामूहिक होता. स्वतंत्र लढण्याचा निर्णय एकट्या माझा नव्हता. फक्त युती तुटल्याची माहिती मी जनतेपर्यंत दिली. आज युती करायचीच आहे. युती होईल असा मला विश्वास आहे. असं वातावरण आहे. चर्चेमध्ये काही गोष्टींना विलंब होतो. पण लवकर निर्णय़ व्हावा.' असं देखील खडसेंनी म्हटलं.


युती होत असेल तर आनंद आहे. युती झाली तर २२० च्या वर जागा येतील. युती नाही झाली तरी एकट्याच्या बळावर भाजपला बहुमत मिळेल. भाजप १६० च्या वर जाऊ शकेल. भाजप सरकार स्थापन करेल असं देखील त्यांनी म्हटलं आहे.


पाहा काय बोलले एकनाथ खडसे