`आम्ही तेव्हा भरपुरात मदतीसाठी धावलो पण सध्याचे मुख्यमंत्री घरात बसून`
आताचे मुख्यमंत्री घरात बसूनच आहेत असा टोला महाजनांनी लगावला
मुंबई : राज्यातील कोरोना आकाडा आटोक्यात आणण्यासाठी ठाकरे सरकार जीवाच रान करत आहे. विरोधी पक्ष असलेल्या भाजपचे नेते राज्यपालांच्या भेटी घेऊन सरकारच्या अपयशाचा पाढा वाचून दाखवत आहे. हे सरकार निष्क्रिय असल्याच्या तक्रारी भाजप सरकार करत आहे. भाजप नेते आणि राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी देखील मुख्यमंत्री आणि मंत्रीमंडळावर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी केरळमध्ये आलेल्या महापुराची आठवण करुन दिली. केरळमध्ये पूर आला होता तेव्हा आम्ही मदतीला धावलो होतो पण आताचे मुख्यमंत्री घरात बसूनच आहेत असा टोला महाजनांनी लगावला आहे.
'कायम राजभवनात जाण्यापेक्षा भाजप नेत्यांनी कधीतरी स्वत:च्याही 'अंगणात' जावे'
राज्यातील जनता कोरोनामुळे हवालदील झाली असताना मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री घाबरलेले आहेत. हे मंत्री जनतेला काय धीर देणार ? असा प्रश्न महाजनांनी उपस्थित केला. मंत्री काय करतायत हे कळायला मार्ग नसल्याचे महाजन म्हणतायत. जनतेचे प्रश्न सोडवण्याऐवजी नागरिकांनी मास्क लावा, पाणी उकळून प्या असे सल्ले घरी बसून मुख्यमंत्र्यांसह मंत्री देत असल्याची टीका महाजन यांनी केली आहे.
हे वाचा : संजय राऊतांच्या राज्यपाल भेटीतल्या फोटोवर भाजपचा निशाणा
राज्यातील सहाहून अधिक वैद्यकीय महाविद्यालयांच्या डीनच्या बदल्या करण्यात आल्या. यावरुन देखील महाजनांनी सरकारवर निशाणा साधलाय. डीनच्या बदल्या करुन सरकारला काय साध्य झालं ? अकार्यक्षण असल्याने जर त्यांची बदली केली तरी दुसरीकडे जाऊन देखील कोरोना रुग्णांचा आकडा वाढवायचाय का ? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला.
राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री कोण आहेत ? हे राज्याला माहिती नाहीए. मंत्री देशमुखांनी एकाही वैद्यकीय महाविद्यालयास भेट दिली नाही. ते देखील घरीच बसून असल्याचे महाजन म्हणाले.