पुणे : BJP leader Girish Mahajan : राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी. भाजप नेते गिरीश महाजन यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कारण तसेच मोठे आहे. गिरीश महाजन यांच्याशी संबंधित गुन्ह्याच्या तपासासाठी गेलेल्या पथकाकडून एक टेम्पो भरुन कागदपत्र जप्त करण्यात आली आहेत. या कागद पत्रात नेमके काय दडले आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही. परंतु या कारवाईने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली आहे. (BJP leader Girish Mahajan's troubles escalated, police confiscated documents related to the crime)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 जळगाव येथे गिरीश महाजन यांच्याशी संबंधित गुन्ह्याच्या तपासासाठी गेलेल्या पथकाकडून एक टेम्पो भरुन कागदपत्र जप्त करण्यात आली. ही सर्व कागदपत्रे पुण्याला आणली आहेत. कोथरुड पोलीस ठाण्यात ही सगळी कागदपत्रे आणण्यात आली आहेत. 


एका संस्थेसंदर्भातल्या वादातून महाजन आणि भोईटे यांच्या विरोधात अपहरणाचा आणि मारहाणीचा गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर चौकशी सुरु झाली आहे. या चौकशीसाठी गेलेल्या पथकाकडून मोठी कारवाई करण्यात आल्यानंतर गिरीश महाजन यांच्या अडचणी वाढल्या आहेत.


गिरीश महाजन यांच्या संस्थेशी संबंधित कागदपत्र ही भोईटे आणि आणखी एक आरोपी तानाजी यांच्या घरी सापडली आहेत. ही सगळी कागदपत्रे संस्थेत असणे अपेक्षित होते. या कागदपत्रांतून मोठे लीड मिळण्याची शक्यता असल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे.