मुंबई : भाजप आमदार नितेश राणे याना मोठा दणका बसला आहे. शिवसेनेचे संतोष परब यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याप्रकरणी नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज  हायकोर्टानं फेटाळला आहे.  नितेश राणे सुप्रीम कोर्टात आता आव्हान देणार आहेत. तोपर्यंत अटकेपासून संरक्षणाची मागणी त्यांनी कोर्टात केली होती. यावर कोर्टाने नितेश राणे यांना २७ जानेवारीपर्यंत अटक न करण्याचे आदेश दिले आहेत. मुंबई हाय कोर्टाने नितेश राणे यांना तात्पुरता दिलासा आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी राणेंवर गंभीर आरोप आहे. या प्रकरणात कोर्टानं राणेंना झटका दिलाय. तर नितेश राणेंसोबत गोट्या सावंत यांच्याही जामीन फेटाळल्याने दोघांवर अटकेची टांगती तलवार आहे. कणकवली सत्र न्यायालायने अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर नितेश राणे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र आता उच्च न्यायालयानेही अटकपूर्ण जामीन देण्यास नकार दिला आहे.


नेमकं प्रकरण काय?
सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक प्रचारावेळी शिवसेना पदाधिकारी संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. याप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांच्याविरोधात कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याविरोधात नितेश राणे यांनी सत्र जिल्हा न्यायालायत अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. 


दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर नितेश राणे माध्यमांसमोर आले होते.