औरंगाबाद : विधानपरिषद निवडणुकीसाठी (Vidhan Parishad) भाजपने (BJP) आपली यादी जाहीर केली.  केंद्रीय समितीने पाच जणांची नावे निश्चित केली आहेत. त्यानुसार प्रवीण दरेकर (Praveen Darekar), माजी मंत्री राम शिंदे (Ram Shinde), श्रीकांत भारतीय (Shrikant Bhartiya), उमा गिरीश खापरे (Uma Khapre), प्रसाद लाड (Prasad Lad) या पाच जणांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. पण यादीतून पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि विनोद तावडे  (Vinod Tawde) यांना मात्र संधी देण्यात आलेली नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यादी जाहीर होण्याच्या एक दिवस आधी विधानपरिषदेसाठी पंकजा मुंडे यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. पण प्रत्यक्ष यादीत मात्र पंकजा मुंडे यांना डावलण्यात आलं. पंकजा मुंडे यांना संधी न मिळाल्याने पंकजा समर्थकांमध्ये नाराजी आहे. उमेदवारीची संधी मिळाल्यास या संधीचं सोनं करेन, असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी काही दिवसांपूर्वीच केलं होतं. 


भाजप समर्थकांचा राडा
भाजप नेत्या पंकजा मुंडेंना उमेदवारी नाकारल्यानंतर कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. औरंगाबादच्या भाजप कार्यालयावर पंकजा मुंडे समर्थकांनी आंदोलन केलं. यावेळी आक्रमक कार्यकर्त्यांनी भाजपविरोधात जोरदार घोषणा दिल्या. तर पंकजा मुंडेंनी पुढील दोन दिवस कोणतीही भूमिका मांडणार नसल्याची माहिती झी 24 तासला दिलीय.


राष्ट्रवादीची भाजपवर टीका
दुसरीकडे मुंडेंना विधानपरिषदेची उमेदवारी नाकारल्यावरून खडसे आणि राऊतांनी भाजपवर गंभीर आरोप केलाय. मुंडे, महाजनांचं राजकारणातून नाव पुसण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टीका संजय राऊतांनी केलीय तर गोपीनाथ मुंडेंनी केलेल्या त्यागाचा भाजपला विसर पडल्याचा आरोप खडसेंनी केलाय. 


चंद्रकांत पाटील म्हणतात 'फुलस्टप नसतो'
दुसरीकडे पंकजा मुंडे यांना संधी का देण्यात आली नाही याबाबत बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी सांगितलं राजकारणात फुल स्टॉप नसतो. इच्छा असणं आणि ती पूर्ण झाली नाही तर हे होणं स्वाभाविक आहे. मानवी स्वभावात नाराजी ही स्विच सारखी नसते ऑन ऑफ करून जाते असे नाही  त्यामुळे त्याला वेळ लागेल, पंकजा ताई त्यांच्या कार्यकर्त्यांना समजवतील असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.