बीड : दसरा मेळाव्याच्या निमित्ताने भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी सावरगाव इथल्या भगवान भक्तीगडावर विराट दसरा मेळावा घेतला. या मेळाव्यात पंकजा मुंडे यांनी चौफेर फटकेबाजी केली.


बाळासाहेबांना शोभणाऱ्या भूमिका घ्या


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं भाषण आहे, त्यांचं भाषण ऐकण्यासाठी मी आतूर आहे. आज मला अपेक्षा आहे की ते सुद्धा जनहिताच्या काही आणखी योजना आणि खंबीर भूमिका घेतील. कारण तीन पक्षांचं सरकार सुरु आहे. एकमेकांना खुश करण्यासाठी जनतेला दुखी करण्याचं काम चाललं आहे. आणि अशा परिस्थिती मुख्यमंत्र्यांच्या काय घोषणा करतील जनतेसाठी. आपल्या बाळासाहेबांना शोभणाऱ्या भूमिका उद्धव ठाकरे घेतील याकडे याची मी वाट पहात आहे असं आवाहन पंकजा मुंडे यांनी केलं.


जनतेच्या हितासाठी काम करा


मी माझ्याही पक्षालाही सांगणार आहे, प्रत्येक नेता उठतो, आणि सांगतो हे सरकार पडणार आहे, या तारखेला पडणार आहे, त्या तारखेला पडणार आहे, आणि सत्ताधारी म्हणतो आमचं सरकार खंबीर आहे. पण तुम्ही सरकार पडणार आणि नाही पडणार याच्याबाहेर येणार आहात की नाही. विरोधी पक्ष रोज मुहूर्त देतोय सरकार पडणार आहे आणि सत्ताधारी म्हणतो सरकार मजबूत आहे. आमचं हे ध्येय नाहीए, जनतेसाठी काय करता यावर बोला. राजकारणातलं गुन्हेगारीकरण संपुष्टात आणताना विरोधी पक्ष नेता म्हणून गोपीनाथ मुंडे यांनी महाराष्ट्रात राण उठवलं, तेव्हा सत्ता परिवर्तन झालं. सत्ताधाऱ्यांनी सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेत, आणि विरोधकांनी विरोधकांच्या भूमिकेत राज्याच्या हिताकडे लक्ष केंद्रीत करा, असं मी सांगणार असल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. 


धनंजय मुंडे यांच्यावर घणाघात


राज्य सरकारने जाहीर केलेलं पॅकेज पुरेसं नाही. सरकारने अधिकच पॅकेज द्यावं, माझ्या शेतकऱ्याची दिवाळी गोड करावी असं माझं आव्हान आहे. अनुदान नाही, काही मदत नाही, आले ते फक्त आमच्या मोदींचे 2 हजार रुपये शेतकऱ्यांना मिळाले. पण राज्य सरकारचे आले का पैसे, असा सवाल पंकजा मुंडे यांनी केला. मग असं काही म्हटलं की यांना राग येणार, आता तुम्ही मंत्री झालात तर तुम्हालाच बोलणार. आता शेतकऱ्यांची काय अवस्था आहे, मीच जाहीर केलेल्या योजना सुरु आहेत. सगळंच बंद आहे, पण त्यांचं चालू आहे. विरोधात असताना हे धमक्या द्यायचे, असं सांगत पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर घणाघात केला.


आपलं मंत्रीपद भाड्याने देऊन टाकलं आहे त्यांनी. आमचं म्हणणं आहे तुम्ही चांगलं काम करा, जनतेच्या हिताचं काम करा, आम्ही जाहीर अभिनंदन करु, आज परिस्थिती काय आहे. महिला अत्याचाराच्या घटना वाढल्यात. अशा घटना बघून गप्प कसं बसणार. महिलांवर अत्याचार होत असतील तर जबाब मागायचा की नाही. असा सवालही पंकजा मुंडे यांनी उपस्थित केला.