मुंबई : मुंबई बँक उत्तम असताना लावलेल्या चौकशीतून काही साध्य होणार नाही असे विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय. मुंबई बँकेकडून अजूनही चोकशी सुरू नाही, अद्याप कोणीही मला जबाबला बोलवलं नसल्याचेही ते म्हणाले.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माझ्यावर चौकशी लावण्यामागे सांगली जिल्ह्यातील एक राजकीय नेता आहे. त्यांनी राजकीय आकसापोटी चौकशी लावल्याचे दरेकरांनी म्हटलंय. इस्लामपूर मधील भाजपा नेते निशिकांत पाटील यांना आम्ही कर्ज दिल्यानंतर रागाला आलेल्या सांगलीतील नेत्याने चौकशी लावली असे जयंत पाटील यांचं नाव न घेता त्यांनी टीका केली. 


शेतकऱ्यांना सोसायटी, खासगी सावकारी कर्ज आहे. त्यामुळे ५ लाखापर्यंतच कर्जमाफी करावी. आता दौरे नकोत, मदत लवकर द्या. तात्कालिक आणि दीर्घकालीन मदत घ्यावी. निर्धारित वेळ ठरवून मदत द्यावी. डाळींब पिकाला मदत देण्या बाबतचे निकष बदलावे अशी मागणी दरेकरांनी यावेळी केली. 



आम्ही डिफॉल्ट गॅरंटीबाबत विचारणा केली. साखर कारखान्यांना अर्थ सहाय्य कसं केलं ? असं आम्ही विचारल्यावर आकसापोटी त्यांनी चौकशी लावल्याचा आरोप दरेकरांनी केली.  


ठाकरे या नावाचा सन्मान आणि आदर ठेवावा आणि शेतकऱ्यांना दिलेली आश्वासन लवकर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाळावे असेही ते यावेळी म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आश्वासनाना जनता विटलेली आहे. प्रत्येकवेळी केंद्रावर टीका करण्याच बोलणं म्हणजे ते राज्यसरकार चालवण्यास सक्षम नाहीत असं होतं असल्याचे दरेकर म्हणाले.