जालना : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांची जीभ पुन्हा घसरली. भर सभेत रावसाहेब दानवे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली. भाजपची जन आशीर्वाद (BJP Jan Ashiward Yatra) यात्रा आज जालन्यातील बदनापूरमध्ये पोहचली. या वेळी झालेल्या कार्यक्रमात रावसाहेब दानवे यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक करत राहुल गांधी यांच्यावर जहरी टीका केली


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दानवे यांनी राहुल गांधी यांचा उल्लेख 'सांड' असा केला. लोकं जनावरं जशी देवाला सोडतात त्यानंतर ती जनावरं कोणत्याच कामाला चालत नाही तसे राहुल गांधी असून ते पंतप्रधान पदासाठी निष्क्रिय असल्याचं दानवे यांनी म्हटलं आहे. सोडलेला सांड कुणाच्याही शेतात जातं आणि खातं. शेताचा मालकही म्हणतो जाऊद्या खाऊ द्या, ते तरी कुठं जाईल खायला. आणि खाऊन मग कसा लठ्ठ्या होतो, अशा शब्दात रावसाहेब दानवे यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाचं कौतुक करताना रावसाहेब दानवे यांनी राहुल गांधी कसे निरुपयोगी आहेत असं सांगताना विखारी शब्द वापरला आहे. रावसाहेब दानवे यांच्या या वक्तव्याने भाजप (BJP) आणि काँग्रेस (Congress) असा नवा वाद पेटण्याची चिन्ह आहेत.