नितेश महाजन, झी मीडिया, जालना : हे तीन पक्षांचं सरकार एकमेकांच्या पायात पाय घालून पडत असेल तर दोष आम्हांला देऊ नये असा टोला केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडीला लगावला आहे. झी २४ तासला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी राऊत-फडणवीस भेटीवर देखील भाष्य केले. राजकीय नेत्यांच्या भेटी गाठी होत असतात. त्यातून राजकीय अर्थ काढू नये असे दानवे म्हणाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशी भेट माझ्यात आणि संजय राऊतांमध्ये देखील झाल्याचे दानवेंनी सांगितले. दिल्लीत मॉर्निंग वॉकला जात असताना भेट झाल्यानंतर संजय राऊत यांनी मला चहाचं निमंत्रण दिलं होतं. म्हणून त्यांची भेट घ्यायला गेलो होतो असं सांगायला देखील दानवे विसरले नाहीत.



सध्याच्या परिस्थितीत हे सरकार पडण्याचा कोणताही प्रयत्न आम्ही करत नाही मात्र हे तीन पक्षांचं सरकार एकमेकांच्या पायात पाय घालून पडत असेल तर दोष भाजपला देऊ नये असंही दानवे यांनी म्हटलंय.