मयुर निकम, झी मीडिया, बुलडाणा : राज्यात आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray Group) एक्शन मोडमध्ये आहे. यवतमाळमध्ये मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांना शह देण्यासाठी माजी मंत्री संजय देशमुख (Sanjay Deshmukh) आज शिवबंधन बांधत असताना दुसरीकडे बुलढाणा (Buldhana) विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि आता शिंदे गटात सामील झालेले संजय गायकवाड यांना शह देण्यासाठी उद्धव गटाने हालचाली सुरू केल्या आहेत.  (bjp leader vijayraj shinde may be join shiv sena uddhav balasaheb thackeray group)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माजी आमदार विजयराज शिंदे हे पुन्हा शिवबंधन बांधणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. शिंदे हे शिवसेनेचे 3 वेळेस आमदार राहिले आहेत. शिंदे हे सध्या भाजपात आहेत. त्यामुळे  बुलढाण्याचे शिंदे गटाचे विद्यमान आ.संजय गायकवाड यांना विजयराज शिंदे यांच्याकडून आव्हान देण्याची रणनिती उद्धव गटाकडून आखल्या जात असल्याची चर्चा सध्या जिल्हाभरात होत आहे. 


शिवबंधन कधी बांधणार, असा प्रश्न शिंदे यांना विचारण्यात आला. यावर "ही लोकशाही आहे. आणि मी 15 वर्षात शिवसेनेचा आमदार म्हणून केलेल्या कामाची कुणी दखल घेत असेल तर वावगं काय? मात्र  उद्धव गटाच्या कुठल्याच मोठ्या नेत्यांनी माझ्याशी संपर्क केलेला नाही",  अशी प्रतिक्रिया विजयराज शिंदे यांनी दिली. दरम्यान बुलढाण्यात आता बंडखोर आ.संजय गायकवाड यांना शह देण्यासाठी हालचालींना वेग आल्याच चित्र राजकीय वर्तुळात आहे.