अजित पवारांच्या एन्ट्रीने भाजपचे `हे` नेते नाराज, फडणवीस काढतायत समजूत
BJP leaders Upset: पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अजित पवारांचे निकटवर्तीय हे भाजप नेत्यांचे कट्टर विरोधक, प्रतिस्पर्धी आहे. त्यामुळे अजित पवारांच्या एन्ट्रीने भाजपच्या गोटात खळबळ माजली आहे.
BJP leaders Upset: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यासोबतच राष्ट्रवादी पक्ष शिवसेना, भाजपच्या सोबत सत्तेत जाऊन बसला. यामुळे भाजपच्या नेत्यांमध्ये नाराजी असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांनी ही नाराजी पक्षश्रेष्ठींकडे बोलून दाखविली आहे.
अजित पवार यांच्या प्रवेशाने नाराज झालेल्या भाजपा नेत्यांची उपमुख्यमंत्री फडणवीस समजूत काढत आहेत. अजित पवार यांचा अचनाक शिंदे फडणवीस सरकारमध्ये झाल्यानंतर अनेक भाजप नेते नाराज झाले आहेत.
उपमुख्यमंत्री फडणवीस प्रत्यक्ष भेटून आणि फोनवरुन या नाराजांची समजूत काढत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा भागात आजी आणि माजी आमदार यांची समजूत काढली जात असल्याचे सांगितले जात आहे.
पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अजित पवारांचे निकटवर्तीय हे भाजप नेत्यांचे कट्टर विरोधक, प्रतिस्पर्धी आहे. त्यामुळे अजित पवारांच्या एन्ट्रीने भाजपच्या गोटात खळबळ माजली आहे.
दरम्यान इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील, समरजीत घाडगे, मुन्ना महाडिक, मराठवाड्यातून राणा जगजित सिंह पाटील, आमदार मेघना बोर्डिकर यांच्यात नाराजी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.