जळगाव : जळगाव महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या सीमा भोळे यांची निवड करण्यात आली आहे. तर उपमहापौरपदी भाजपचे डॉ. अश्विन सोनवणे यांच्या निवडीची अधिकृत घोषणा आज करण्यात आली. पालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत निवडीची घोषणा झाली आहे. सीमा भोळे ह्या जळगाव शहराचे भाजप आमदार सुरेश भोळे यांच्या पत्नी आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एमआयएमच्या 3 नगरसेवकांनी तटस्थ भूमिका घेतल्याने आणि शिवसेनेचे १५ नगरसेवक या निवड प्रक्रियेला गैरहजर राहिल्याने भाजपच्या उमेदवाराचा विजय झाला आहे. पालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत जलसंपदामंत्री गिरीश यांच्या नेतृत्वाखाली भाजपला ५७ जागांवर यश मिळालं होतं. त्यापाठोपाठ शिवसेनेचे १५ तर एमआयएमचे ३ नगरसेवक या निवडणुकीत निवडून आले होते. 


दरम्यान, प्रथमचं भाजपला महापालिकेत एकाच वेळी महापौर उपमहापौरपद मिळाल्यानं शहराच्या विकासाला चालना मिळेल असा विश्वास भाजप आमदारांनी यावेळी व्यक्त केला.