नागपूर : भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष जमाल सिद्दीकी यांच्या घरासमोर उभी असलेली त्यांची कार अज्ञाताकडून जाळण्यात आली. रात्री एक ते दीडच्या दरम्यान अज्ञात लोकांनी दत्तात्रय नगर परिसरात त्यांच्या घरासमोर उभी असलेल्या कारवर ज्वलनशील पदार्थ टाकून गाडी पेटवून दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कार हल्ल्याची ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून कार पेटवल्यानंतर हल्लेखोर पळून गेले. मी भाजपचा काम करतो म्हणून काही कट्टरपंथी मुस्लिमांना हे आवडत नाही. हे काँग्रेसशी संबंधित कट्टरवादी हल्लेखोर असावेत, असा संशय जमाल सिद्दकी यांनी व्यक्त केला आहे.  


माझ्यावर गेल्या काही दिवसात हा दुसरा हल्ला असून मला फोनवर जीवे मारण्याची धमकी ही दिली गेली होती. प्रत्येक वेळा पोलिसांकडे तक्रार केली. मात्र नागपूर पोलीस माझ्या तक्रारीबद्दल संवेदनशील नाही, असा आरोप जमाल सिद्दीकी यांनी केला आहे.