चंद्रपूर : भाजपचे काटोलचे नाराज आमदार डॉ. आशिष देशमुख यांची 'विदर्भ आत्मबळ यात्रा' चंद्रपुरात पोचली. वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी भाजपला कोंडीत पकडून त्यांनी ही यात्रा सुरु केली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे लोक त्यांचं विदर्भात स्वागत करत आहेत. 


योग्य वेळी राजीनामा देणार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

‘मुख्यमंत्री विरोधी पक्षात असताना त्यांनी ७ वेळा विधानसभेत वेगळा विदर्भ विषय मांडला आहे. ४ वर्षे आधी मुख्यमंत्र्यांना असलेली विदर्भाविषयीची तळमळ हरवली आहे. आपल्या पत्राला त्यांनी अद्याप उत्तर दिलेले नसून आपला त्यांच्यावरील विश्वास उडाला आहे. योग्य वेळ येताच आपण आमदारकीचा राजीनामा देणार असून भाजपमधील अनेक आमदार अस्वस्थ असल्याने ही खडखड येत्या काळात प्रकर्षाने पुढे येईल, अशी भूमिका त्यांनी चंद्रपुरात मांडली.


‘लहान राज्य भाजपचं धोरण’


आमदार आशिष देशमुख याआधी म्हणाले होते की, ‘शिवसेनेने वेगळे लढण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेचा वेगळ्या विदर्भासाठी विरोध होता. त्यामुळे गळ्यातील हाड निघाले आहे. आता मराठीचे तीन राज्य निर्माण होण्यासाठी शिवसेनेने पुढे यावे. यातून राज्य निर्मिताचा प्रश्न केंद्रात सुटू शकतो. केंद्र सरकारच निर्णय घेतं. लहान राज्य हे भाजप पक्षाचे धोरण आहे. मुख्यमंत्र्यांना यासंदर्भात पत्र दिले होते. त्यांनी अद्याप उत्तर दिले नाही. राज्यातील ज्येष्ठ नेत्यांकडून ठराव येऊ द्यावे, असे केंद्रातील नेत्यांचे म्हणणे आहे.


विदर्भातून बाहेर राज्यात स्थलांतर 


वित्तमंत्री विदर्भाचे आहेत. तरीही सिचंनासाठी तरतूद झाली नाही. विदर्भातील शेतक-यांना ७-८ तास वीज दिली नाही. याउलट तेलंगाना सरकार २४ तास शेतक-यांना वीज देत आहे. विदर्भातून बाहेर राज्यात स्थलांतर सुरू आहे. तरूणांच्या हाताला काम नाही. येणा-या कालावधीत युवकांच्या आत्महत्या सुरू होतील.