BJP MLA Laxman Jagtap passed away : पिंपरी-चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap ) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. गेल्या काही महिन्यांपासून कॅन्सरशी त्यांचा लढा सुरु होता. अखेर त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आहे. पिंपरीच्या ज्युपिटर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान, याआधी गेल्या आठवड्यात पुण्यातील कसबा पेठेच्या आमदार मुक्ता टिळक यांचे देखील कॅन्सरच्या आजाराने निधन झाले होते. या दोघांच्या जाण्याने भाजपसाठी मोठा धक्का बसला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2014 पर्यंत अजित पवार यांचे विश्वासू आणि 2014 च्या लोकसभा निवडणुकीत शेकाप मनसे पाठिंब्यावर निवडणूक लढली पण पराभव झाला. (Maharashtra Political News) त्यानंतर विधानसभेला भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपकडून उमेदवारी मिळवत त्यांनी विजय मिळवला.  2017 च्या महापालिका निवडणुकीत त्यांनी महत्वाची भूमिका बजावली. त्यांनी पालिकेत भाजपला विजय मिळवून दिला.


पिंपरी-चिंचवड महापालिकेतून लक्ष्मण जगताप यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात झाली. 1986 साली ते काँग्रेसचे नगरसेवक म्हणून निवडून आले. नंतर1999 साली शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस या नव्या पक्षाची स्थापना केल्यानंतर, जगताप यांनी काँग्रेसला राम राम करत राष्ट्रवादीत प्रवेश केला.  


लक्ष्मण जगताप हे पिंपरी चिंचवडच्या स्थायी समिती अध्यक्षपही राहिले आहेत. तसेच पिंपरी-चिंचवडचे महापौर होते. त्यानंतर 2004 साली ते विधानपरिषदेचे सदस्य झाले. या काळात ते राष्ट्रवादीतच होते. 



भाजप आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांनी प्रकृती चिंताजनक असतानाही विधान परिषदेसाठी भाजपसाठी मतदान केले होते. त्यामुळे या दोन्ही आमदारांचे भाजने विशेष आभार मानले होते. 22 डिसेंबर रोजी मुक्ता टिळक यांचे निधन झालं तर आज 3 जानेवारी रोजी लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने भाजपला मोठा धक्का बसला आहे.