अहमदनगर : नगर केडगाव येथे शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांड प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्यासह पाच जणांना अटक करण्यात आली. त्यानंतर भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांना या प्रकरणात आज पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलीस कार्यालयात तोडफोडप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे आमदार अरुण जगताप यांना देखील ताब्यात घेतलं जाणार आहे. संग्राम जगताप, संदीप गुंजाळ, भानुदास कोतकर, बाळासाहेब कोतकर, विशाल कोतकर यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तर इतर 22 जणांना 10 दिवसांची पोलीस कोठडी दिली गेली आहे.


शिवसेना नेते नगरमध्ये दाखल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शनिवारच्या घटनेनंतर शिवसेनेचे नेते रामदास कदम आणि दिवाकर रावते नगरमध्ये दाखल झाले. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची त्यांनी भेट घेऊन शासकीय विश्रामगृहात चर्चा केली. दुसरीकडे नगरमधील प्रकार हा राजकीय वाद नसून भाऊबंदकीचा वाद असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. 


शिवसेना आक्रमक


अहमदनगर केडगाव पोटनिवडणुकीत झालेल्या दुहेरी हत्याकांडानंतर, शिवसेना आपल्या मागणीवर आक्रमक झाली आहे. भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले यांनाही अटक करावी अशी मागणी शिवसेनेने केली होती. सर्व मुख्य आरोपींना अटक केल्याशिवाय, अंत्यविधी करणार नसल्याची भूमिका स्थानिक शिवसेना नेत्यांनी घेतली होती. पण परिस्थिती अधिक चिघळू नये म्हणून शिवसेनेच्या नेत्यांनी अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला.