ड्रायव्हरच्या नावे 75 कोटींचा फ्लॅट, 4 जणांची हाडंही सापडली नाहीत; सुरेश धस यांचे वाल्मिकवर आरोप
BJP MLA Suresh Dhas: आका आणि आकाच्या आकाला सगळ्यांना हिस्सा मिळतो, असा आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी केलाय.
BJP MLA Suresh Dhas: मी सोमनाथकडे परभणीला जाऊन आलो. त्यांनाही न्याय मिळाला पाहिजे ही आमची भूमिका आहे. परळीत इराणी समाजाचे काही लोक आहेत ते गांजा चरस विकतात. यांच्या जीवावर, त्यांच्या कडून हिस्सा मिळवायला आकाने पोलीस ठेवले होते. यातला हिस्सा त्यांच्या आकालाही जायचे, थर्मलमध्ये, भंगारमध्ये यांचा वाटा होता, आका आणि आकाच्या आकाला सगळ्यांना हिस्सा मिळतो, असा आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी केलाय.
करुणा असो की डॉ देशमुख असो त्यांचं चारित्र्य हनन यांनी केले. करुणा मुंडे यांच्या सौभाग्यवती. त्यांच्या गाडीत पोलिसांनी बंदूक ठेवली होती. संजय असं त्या पोलिसाचं नाव असून बुरखा घालून त्याने बंदूक ठेवली होती.परळीत पोलीस आका आणि वरिष्ठ आका यांच्या इशाऱ्यावर सगळं काही जमा करतात, असं ते म्हणाले.
सगळ्या कंपन्यांकडून यांना हफ्ता जातो. यांच्या हफत्याला कंटाळून कोरोमांडल कंपनी निघून गेली. एक आका आत आहे मात्र बाहेरच्या आका ने याचे उत्तर द्यावे. पोलीस आकाचे ऐकत असतील तर माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, सावधान इंडियामधल्या पोलिसांची इथं नियुक्ती करावी. खरे पोलीस इथं काही करत नाहीत. मी लेखी पत्र देणार आहे. सीआयडी आणि सावधान इंडिया कार्यक्रमातील पोलिसांची आता परळी मध्ये नियुक्ती द्या, असे सुरेश धस म्हणाले.
छोट्या आकाला 2022 मध्ये ईडी नोटीस आली आहे.यावेळी वाल्मिक कराडने कुणाच्या नावावर जमिनी घेतल्या ते सुरेश धस यांनी वाचून दाखवले. वॉचमनच्या नावावर जमीन घेतली आहे. पुण्यात एफ सी रोडवर सुशील पाटील बिल्डर आणि छाजेड त्याचे पार्टनर आहेत. तिथं आकाने 7 शॉप घेतले आहेत. 601 ते 607 क्रमाकांचे गाळे आकाने घेतले आणि 608 दुकान विष्णू चाटे यांच्या बहिणीच्या नावावर आहे. यातील एकाची किंमत 5 कोटी आहे. वाल्मिक आकाच्या नावावर 4 शॉप त्यांच्या दुसऱ्या पत्नीच्या नावावर 3 शॉप आणि चाटेच्या नावावर एक म्हणजे 40 कोटींचे शॉप आहेत, असा खळबळजनक आरोप सुरेश धस यांनी केला.
पुण्यात मागरपट्टामध्ये एक फ्लॅट ची किंमत 15 कोटी रुपये आहेत. तिथं त्यांनी एक मजला पूर्ण विकत घेतला आहे. तो मजला वाल्मिक अण्णाच्या ड्राइवरच्या नावावर आहे. त्याची किंमत 75 कोटी आहे. त्यामुळे हे सगळे प्रकरण ईडी च्या दरबारात गेले. यावेळी सुरेश धस यांनी वाल्मिकच्या प्रॉपर्टीबाबत तपशीलवार माहिती दिली.
परळीमध्ये वर्षभरात 109 मृतदेह सापडले. 105 कळले 4 लोकांचे तर काही सापडलं नाही. हाडंही सापडली नाहीत, अशी परिस्थिती आहे म्हणूज यांना संतोष देशमुख च्या अंगावर जायची हिंमत होते. त्यामुळं आका 302 आरोपी आहे. आणि यासोबत मोठा आका फोनवर बोलत असेल तर तो पण रांगेत आला पाहिजे. औरंगाबादचा जलील खान पट्टेवाला त्याला परळीमध्ये नेऊन मारले आणि 40 लाख देऊन प्रकरण मिटव म्हणाले. ज्याला 40 लाखात मारायचं आहे त्याने परळीला जावे मी जुळवून देईन, असा टोला सुरेश धस यांनी लगावला.
संतोष देशमुख याने दलित मुलाला मारले म्हणून आरोपीला एक चापट मारली होती त्याच फळ काय निर्घृण खून केला. मुद्दे पालटवायला कलाकार आणतात आणि त्यांना पुढे करतात. ते काहीही बोलतात. Della रिसॉर्ट लोणावळा 10 दिवस कोण कुणासोबत राहिले याचीही माहिती माझ्याकडे आहे. मला जास्त बोलायला लावू नका, असे धस म्हणाले.
ए आका इतने कोटी लेके तू जायेगा कहा...
इतका माल कमावून काय करायचं देवाकडे साडेतीन फुटात जावे लागते. मारहाण केली आणि व्हीडिओही केला. पाणी मागितलं तर तोंडात वेगळं काही टाकतात. जल्लाद जेव्हा फाशी देईल तेव्हा तुमचं तोंड मला पाहायचं आहे. प्रति मोर्चे काढणारे कशासाठी मोर्चे काढताय भान ठेवा. अरे बाजू घ्या पण देशमुख कुटुंबियांच्या डोळ्यातील अश्रू तुम्हाला का दिसत नाही आधी सांगा, असे सुरेश धस म्हणाले.