मुंबई : राज्य सरकार पुण्याकडे दुर्लक्ष करत आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार लोकप्रतिनिधींना विश्वासात घेत नसल्याची नाराजी खासदार गिरीष बापट यांनी व्यक्त केलीय. तसेच बाराबलुतेदार आणि हातावर पोट असलेल्यांसाठी महाराष्ट्र सरकारनं पॅकेज जाहीर करण्याची मागणीही त्यांनी केलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अजित पवार लोकप्रतिनिधींना विश्वासात घेत नाहीत. अजितदादा पुण्यात बैठक घेतात पण आम्हाला बोलवलं जात नसल्याचा आरोप भाजप नेते गिरीश बापट यांनी केलाय. मुख्यमंत्र्यांनी कोरोनाबाबत पुण्याची बैठक घेतली नाही. पुण्याचा दौराही केला नाही. 



केंद्राने राज्याला अडीच हजार कोटी पेक्षा जास्त निधी दिला आहे. केंद्रानं राज्याला पाठवलेले ५०० वेंटिलेटर पुण्याला द्यावे अशी गिरीष बापट यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे मागणी केली. मेडीकल कॉलेजात २० टक्के जागा कॅन्सर रूग्णांसाठी राखीव असतात. त्या जागा मिळतील तिथे कोरोना रूग्णांसाठी राखीव ठेवाव्यात असेही ते म्हणाले.


राज्यानं बाराबलुतेदारासाठी पॅकेज जाहीर करावं. जीएसटीचा परतावा कोरोनासाठी वापरता येऊ शकतो असेही ते म्हणाले.