नाशिक : राज्यात धनगर आरक्षण देताना अनुसूचित जाती जमातीमध्ये देण्यात येऊ नये म्हणून थेट भाजपचे दिंडोरीचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. विभागातील विविध आदिवासी संघटना आणि पक्षांचे आदिवासी नेते यांनी यासंदर्भात नाशिकमध्ये बैठक घेत एल्गार आंदोलनाची दिशा ठरवली. केंद्र आणि राज्यात भाजपचे सरकार असतानाही राज्यातील आदिवासींच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जातं आहे.


बोगस आदिवासींना संरक्षण दिले जातंय. त्यातच आता मराठा आरक्षण झाल्यावर धनगर आरक्षणावरून आदिवासींची कोंडी होणार असल्याची भावना आदिवासी समाजात तयार होत आहे. नाशिकमध्ये झालेल्या बैठकीत राष्ट्रवादीच्या आमदारांसह विविध नेते सहभागी झाले होते. चव्हाण यांना आमदार झिरवाळ यांनीही साथ दिल्यानं आदिवासींचा संघर्ष आता राजकीय टोकाला पोहोचल्याचा दिसून येतो आहे.