उद्धव ठाकरेंचा दारुण पराभव झाल्यानंतर कंगनाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली `घाणेरड्या शिव्या...`
Kangana Ranaut on Uddhav Thackeray: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत एकीकडे महायुतीचा मोठा विजय झाला असताना, महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) दारुण पराभव झाला आहे. महाविकास आघाडीला फक्त 50 जागा मिळाल्या असून, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला फक्त 20 जागा मिळाल्या आहेत.
Kangana Ranaut on Uddhav Thackeray: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत एकीकडे महायुतीचा मोठा विजय झाला असताना, महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) दारुण पराभव झाला आहे. महायुतीला 234 जागा मिळाल्या असून, भाजपाला 132, शिवसेना 57 आणि राष्ट्रवादी 41 जागा जिंकल्या आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीला फक्त 50 जागा मिळाल्या असून, उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackkeray) शिवसेनेला फक्त 20 जागा मिळाल्या आहेत. तर काँग्रेसला 16 आणि राष्ट्रवादीला 10 जागा जिंकता आल्या. दरम्यान या निकालावर अभिनेत्री आणि भाजपा खासदार कंगना रणौतने प्रतिक्रिया दिली आहे.
उद्धव ठाकरेंच्या पराभवावर बोलताना कंगनाने दानवांचा पराभव झाला आहे अशा शब्दांत आपली प्रतिक्रिया नोंदवली. तसंच आपल्या घरावर करण्यात आलेल्या कारवाईचा उल्लेख करत त्यांची बुद्धी भ्रष्ट झाल्याचं दिसत होतं असंही म्हटलं
"आमच्या पक्षासाठी हा ऐतिहासिक विजय आहे. आम्ही सर्व कार्यकर्ते उत्साहित आहोत. संपूर्ण महाराष्ट्र आणि भारतातील जनतेचे आम्ही आभारी आहोत," असं कंगना रणौत म्हणाली आहे. मुख्यमंत्री म्हणून कोणाला पाहायला आवडेल? असं विचारलं असता कंगनाने "पक्ष यासंबंधी निर्णय घेईल असं सांगितलं. आमच्याकडे नेतृत्व करण्यासाठी एकापेक्षा एक लोक आहेत," असं सांगितलं.
उद्धव ठाकरेंचा इतका वाईट पराभव होईल याची तुम्हाला अपेक्षा होती का? या प्रश्नावर कंगना म्हणाली, "हो मला अपेक्षा होती. इतिहास याचा साक्षीदार आहे आणि माझे अनेक रीलही व्हायरल होत आहेत की आपण देव आणि दानवांना कसं ओळखतो. जे महिलांची अब्रू उतरवतात, ते दैत्य असतात. दुसरीकडे महिलांना 33 टक्के आरक्षण, धान्य, गॅस सिलेंडर दिलं आहे त्यावरुन कोण देव आहे आणि कोण दैत्य हे समजत आहे.त्यामुळे दैत्यांचं तेच झालं जे नेहमी होतं. त्यांचा पराभव झाला.
पुढे ती म्हणाली, "महाभारतात एकच कुटुंब होतं, पण किती फरक होता. सर्व भाऊ होते. जे महिलांचा अपमान करतात. माझं घऱ तोडण्यात आलं. घाणेरड्या शिव्या देण्यात आल्या. त्यांची बुद्धी भ्रष्ट झाल्याचं दिसत होतं".